द बिग बुल मधील अभिषेक बच्चनच्या कामावर अमिताभ बच्चन खूश झाले आहेत आणि त्यांनी एका ट्विट संदेशात आपल्या लेकाचे अभिनंदन केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर “द बिग बुल’च्या ओपनिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
त्याबद्दल बच्चन यांनी अभिषेकचे कौतुक केले आहे. अभिषेकला उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये बच्चन यांनी स्वतःला “प्राऊड फादर’ संबोधले आहे. जेव्हा मुलगा वडिलांचे बूट घालायला लागतो तेव्हा तो मुलगा राहत नाही. तो तुमचा मित्र होतो, असे बच्चन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अभिषेकने “द बिग बुल’ च्या रोलसाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्याबाबत कॉमेंट करणे खूपच अवघड आहे असेही बच्चन यांनी म्हटले आहे.