अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. चार दिवसांपासून त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे वृत्त आहे. यावेळी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन आणि अभिषेक बच्चन त्यांच्यासोबत होते.

मंगळवारी रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना डॉक्‍टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. रुटीन चेकअपनंतर डॉक्‍टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. रुग्णालय किंवा बच्चन कुटुंबियांकडून त्यांच्या उपचाराबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते सुखरुप असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. यापूर्वी 2012 मध्ये शस्त्रक्रियेसाठी अमिताभ तब्बल 12 दिवस रुग्णालयात होते. अमिताभ यांना यकृताची समस्या असल्यामुळे त्यांना वेळोवळी तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.