महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा

मुंबई- महानायक अमिताभ बच्चन ह्यांना कोरोना ची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  अमिताभ बच्चन यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली.

‘मी स्वत:ला रुग्णालयात दाखल केलं असून माझा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर, माझे कुटुंबीय आणि संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या स्वॅबचा अहवाल अद्याप आला नसल्याचे अमिताभ यांनी सांगितले.

दरम्यान, ही माहिती मिळताच त्यांच्या अनेक चाहत्यांच्या भुवया उचावल्या आहेत. चाहते ते लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करणारे पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.