Amit Thackeray On Aditya Thackeray । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. त्यातच मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. कारण याठिकाणावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. अमित ठाकरेंनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अमित ठाकरेंसोबत राज ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, आई शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमित ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी,”मी निवडणुकीसाठी तयार आहे. बाकी कोणाबाबत मला माहिती नाही. कोण फॉर्म मागे घेणार याबाबत माहीत नाही. मी माझा व्हीजन घेऊन पुढे जाणार आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच माझ्यावर दडपण नाही. मला माध्यमांशी बोलतानाचा दडपण जाणवतं, हेच एक दडपण आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील अमित ठाकरे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात असं पत्रकारांनी सांगितल्यानंतर, ‘त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत, असे अमित ठाकरे म्हणाले. मला माहीम मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या घरापर्यंत पोहाचायचं आहे, असेही अमित ठाकरेंनी दिली.
माहीम विधानसभा मतदारसंघाची सर्वत्र चर्चा Amit Thackeray On Aditya Thackeray ।
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यादरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने माहीमविधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माहीममध्ये मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
अमित ठाकरेंना पाठिंबा देणे आमचेही कर्तव्य Amit Thackeray On Aditya Thackeray ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला एकही जागा न घेता महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे की, अमित ठाकरे यांना पाठिंबा देणे. मात्र, तिथे आमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यांचा योग्य तो मान राखून सन्मान दिला जाईल. या ठिकाणी तोडगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढणार आहेत. अमित ठाकरेंना पाठिंबा देणं काम आहे, राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम आहे, असे विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केले.