कलम 371ला हात लावणार नाही : शहा

गुवाहाटी : जम्मू काश्‍मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर कलम 371 रद्द करण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याची अफवा पसरवण्यात येत आहे. पण त्यात कोणतेही तथ्य नसून सरकारचा तसा विचारही नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले.

इशान्य परिषदेच्या 68 ब्या अधिवेशनात शहा बोलत होते. ते म्हणाले, 370 कलम हे तात्पुरत्या स्वरूपाचे होते. तर 371 नुसार इशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा दिला आहे. त्यात कोणताही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. यापुर्वी मी हे संसदेतही बोललो आहे आणि आता आठ राज्याषच्या मुख्यमंत्र्यापुढेही तेच बोलत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here