मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात

अमित शहा यांच्या या भूमिकेचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं स्वागत

Madhuvan

मुंबई – राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेलं पत्र आणि त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं प्रतिउत्तर यांमुळे वादळी चर्चा रंगल्या आहेत.

हे प्रकरण आता चांगलंच तापलेलं असतानाच अमित शाह यांनी   या मुद्यावरून प्रश्न विचारला असतात या मुद्यावर  भाष्य केलं आहे.

“राज्यपाल धर्मनिरपेक्ष आहेत की नाहीत? पंतप्रधानांनी तपासावे”

अमित शाह यांनी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मी पत्र वाचले आहे. त्यांनी काही शब्द टाळले असते, तर बर झालं असतं. त्यांनी ते विशेष शब्द टाळायला पाहिजे होते.” 

यावर आता संजय राऊत यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे की,’अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात.’

दरम्यान, अमित शहा यांच्या या भूमिकेचं शिवसेना खासदार संजय राऊत स्वागत केलं आहे. एवढंच नाही तर त्यांचे आभारही मानले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.