अमित शहा यांचा रोड शो 

अहमदाबाद – भाजपचे अध्यक्ष आणि गांधीनगर मतदार संघातील उमेदवार अमित शहा यांनी आज आपल्या मतदार संघात रोड शो करून भाजपचा स्थापना दिवस साजरा केला. जनसंघाचे संस्थापक दीन दयाळ उपाध्याय आणि शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अहमदाबादच्या सरखेज भागातून रोडशोला प्रारंभ केला. शोच्या सुरूवातीला आमित शहा यांनी, जहा हुए बलिदान मुखर्जी वो कश्‍मीर हमारा है, सारा का सारा हमारा हेै अशा घोषणा दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितु वाघानी हे सहभागी झाले होते. वेजलपुर, प्रल्हादनगर, जिवराज पार्क, मानसी क्रॉस रोड, इत्यादी भागातून त्यांनी ही प्रचार यात्रा काढली. तसेच संध्याकाळी त्यांनी साबरमती भागातून प्रचार यात्रा काढली. संध्याकाळी ते आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांनी या मतदार संघातून गेल्या शनिवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदार संघात आडवाणी यांच्या ऐवजी यंदा पक्षाने अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.