भुवनेश्वर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या ओडिशा दौर्यावर आहेत. 28 फेब्रुवारी रोजी नागरिक सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. ओडिशा प्रदेश भाजपा अध्यक्ष समीर मोहंती यांनी रविवारी ही माहिती दिली.
सीएएच्या समर्थनार्थ शाह 28 फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार असल्याचे मोहंती म्हणाले. या जाहीर सभेत एक लाखाहून अधिक लोक येतील असा दावा त्यांनी केला. तसेच शहा पुरीतील जगन्नाथ मंदिर आणि भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिर भेट देतील असेही ते म्हणाले.