कोलकाता: लोकसभा निवडणुकांचा शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा येत्या रविवारी 19 मे रोजी पार पडणार असून देशभरातील प्रमुख नेतेमंडळी आपापल्या लोकसभा उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आज उत्तर कोलकत्तामध्ये रोड शो आयोजित केला आहे.
कोलकत्तामध्ये रोड शो पूर्वी टीएमसी कार्यकर्ते आणि पोलिसांकडून भाजपचे पोस्टर आणि झेंडे हटवण्यात आले आहेत. कैलाश विजयवर्गीया म्हणाले, “ममताजींच्या गुंडांनी आणि पोलिसांनी सर्व पोस्टर आणि झेंडे काढून टाकले. आम्ही येथे पोचल्यानंतर लवकरच ते पळून गेले.”
West Bengal: BJP alleges that party posters and flags were removed by TMC workers and Police ahead of Amit Shah's roadshow in Kolkata. Kailash Vijayvargiya, says,"Mamata ji's goons and police removed all the posters and flags. They escaped soon after we reached here." pic.twitter.com/QNrHnzHSbN
— ANI (@ANI) May 14, 2019