नवी दिल्ली- पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात 57 सदस्यांना स्थान मिळाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्यादिवशी (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खात्यांचे वाटप केले. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘अमित शहा’ हे देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. दरम्यान, अमित शहा यांनी आज (१जून) पासून केंद्रीय गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. गृहमंत्री झाल्याने अमित शहा यांचा समावेश ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ मध्ये होणार आहे.
Delhi: Union Home Minister Amit Shah to meet Joint Secretaries of the Ministry of Home Affairs today. (file pic) pic.twitter.com/1uXfdt6zpY
— ANI (@ANI) June 1, 2019