अमित शाह आज दिवसभर मुंबई दौऱ्यावर

संग्रहित छायाचित्र

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी सवांद साधतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित लघुपटाच्या विषेत प्रदर्शनातही ते सहभागी होतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. त्यामुळे अमित शाह यांची भेट महत्वपूर्ण ठरली आहे. मात्र अमित शाह मराठा आरक्षणासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील, हे स्पष्ट नाही. अमित शाह यांचा मुंबई दौरा आधीच नियोजित असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित लघुपटाची राष्ट्रपती भवन येथे नुकतीच स्र्क्रीनिंग झाली. मात्र आज अमित शाह मुंबई दौऱ्यावर असल्यामुळे लघुपटाचे विशेष प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.

लघुपट निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘चलो जीते हैं’ हा लघुपट ३२ मिनिटांचा आहे. या चित्रपटात दाखवलेला मुलगा स्वामी विवेकानंद यांच्या ‘वही जीते हैं, जो दूसरों के लिए जीते हैं’ या वाक्यापासून प्रभावित होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)