चंदीगढ – हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे बडे नेते प्रचारसभा घेत आहेत. मंगळवारी मोदींनी राज्यात दोन सभा घेतल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या ४ सभांचे आयोजन हरियाणामध्ये करण्यात आले आहे. फरिदाबाद, बहादुरगड, गुरुग्राम येभे अमित शाह सभा घेणार आहेत.
Union Home Minister and BJP President Amit Shah to address rallies in Faridabad, Samalkha, Bahadurgarh and Gurugram in Haryana, today. #HaryanaAssemblyPolls
(File pic) pic.twitter.com/6ViF2XDyih— ANI (@ANI) October 16, 2019
पंतप्रधान मोदींच्याही हरियाणामध्ये चार प्रचारसभा असणार आहेत. यामधील पहिली सभा ही फरिदाबाद जिल्ह्यातील बल्लभगढ येथे १४ ऑक्टोबर रोजी झाली. त्यानंतर काल (१५ ऑक्टोबर) चाखरी दादरी आणि हिसारमध्ये मोदींची सभा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील हरियाणामध्ये प्रचारसभा घेत आहेत. ९ ऑक्टोबर रोजी अमित शाह यांनी कैथल, हिसार, भिवानी आणि रोहतक जिल्ह्यांमध्ये सभा घेतली होती.
हरियाणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी ७० वर्षांपासून पाकिस्तानला जात आहे, मी ते पाणी भारतात अडवेल आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणेल. या पाण्यावर भारतातील शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी हरियाणातील चारखी दादरी येथे प्रचार सभेदरम्यान केले.