अमित शहा देव आहेत का? – ममता बॅनर्जी

कोलकाता  – पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या वाहनावर रोड शोदरम्यान हल्ला झाला. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकदेखील करण्यात आली. कोलकात्यातील रक्तरंजित राड्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधला ममता बॅनर्जी यांनी अमित शहा खोचक टीका केली की,’अमित शह स्वतःला काय समजतात? त्यांच्या विरोधात कुणी निदर्शने करू नयेत, यासाठी ते देव आहेत का? असाही सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. शहा यांच्या रोड शो वेळी झालेल्या हिंसाचाराचे खापर ममतांनी भाजपवर फोडले.

 

तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या येथील रोड शोवेळी मंगळवारी तुफान राडा झाला. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही.  राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. याबाबत माध्यमांशी बोलतांना अमित शहा यांनी तृणमूलपक्षावर हल्लाबोल करत म्हटले, ‘तृणमूलच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचाच हिंसाचाराला चिथावणी देण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी सुरक्षित राहिलो. संघर्षावेळी पोलीस मूक प्रेक्षक बनले.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.