मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी अमित शहा राष्ट्रपती भवनात दाखल

नवी दिल्ली– २०१९ लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ‘नरेंद्र मोदी’ आज सायंकाळी ७च्या सुमारास पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आजच्या सोहळ्यासाठी भाजप अध्यक्ष ‘अमित शहा’ देखील राष्ट्रपती भवनात उपस्थित झाले आहेत.

आज, शपथविधी सोहळ्याला सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी विरोधी पक्षनेत्यांबरोबरच बिमस्टेक देशांचे प्रमुख, उद्योगपती, चित्रपट तारे, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×