नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.
आज मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आई है।
मैं ईश्वर का धन्यवाद करता हूँ और इस समय जिन लोगों ने मेरे स्वास्थ्यलाभ के लिए शुभकामनाएं देकर मेरा और मेरे परिजनों को ढाढस बंधाया उन सभी का ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ।
डॉक्टर्स की सलाह पर अभी कुछ और दिनों तक होम आइसोलेशन में रहूँगा।— Amit Shah (@AmitShah) August 14, 2020
त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ‘आज माझा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. मी देवाचे आभार मानतो आणि याकाळात ज्या लोकांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि मला व माझ्या कुटुंबाला धीर दिला, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात रहावे लागणार आहे.
गृहमंत्री पुढे म्हणाले, ‘मी मेदांता रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचार्यांचेही आभार मानतो ज्यांनी मला कोरोना संक्रमणाशी लढण्यासाठी मदत केली आणि माझ्यावर उपचार केले.’
दरम्यान, 2 ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. स्वत: गृहमंत्र्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.