Amit Shah | Babasaheb Ambedkar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यातील हिवाळी अधिवेशनात देखील पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. आंबेडकरांचे नाव घेणे ही सध्या फॅशन झाली आहे, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले होते. यावरून आता विरोधकांनी अमित शाह यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.
अमित शाहांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन दिल्लीतील संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केलं. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वर्षा गायकवाड हे या आंदोलनात सहभागी झाले होते. अमित शाहांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. शाहांविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून ‘अमित शाहा माफी मांगो’ अशा घोषणा संसदेबाहेर दिल्या जात आहे.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
“अभी यह फैशन चल गया है अंबेडकर अंबेडकर अंबेडकर नाम लेने का
इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता” : अमित शाह
बाबा साहेब का यह अपमान सिर्फ़ और सिर्फ़ वो आदमी कर सकता है जिसको उनके संविधान से चिढ़ है
और जिसके पुरखों ने शोषितों वंचितों के मसीहा बाबासाहेब के पुतले जलाये… pic.twitter.com/1CLVEJDtRi
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) December 17, 2024
“आता एक फॅशन झाली आहे. आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर स्वर्ग लाभला असता,” असं अमित शाहांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधताना लोकसभेतील भाषणाच्या सुरुवातीला म्हटलं. याच मुद्द्यावरुन आता विरोधकांनी अमित शाहांवर टीकेची झोड उठवली आहे. अमित शाहांच्या या विधानाचा व्हिडीओ विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे.
नेमकं काय घडलं होत…
काल (मंगळवारी) लोकसभेमध्ये ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक मांडण्यात आलं. यावर विरोधकांनी सदर विधेयक हे संविधानविरोधात आहे असा आक्षेप घेतला. बाबासाहेबांच्या संविधानाच्याविरोधात हे विधेयक असून संघराज्य पद्धतीच्या मूलभूत तत्वांना विरोध करणार असल्याचं विरोधकांनी म्हटलं.
यावरुन अनेक खासदारांनी आपली भूमिका सदनासमोर मांडली. त्यानंतर या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांनावर निशाणा साधला. मात्र भाषणाची सुरवात करताना त्यांनी आंबेडकरांचं नाव घेतलं. यावरूनच हा वाद सुरु झाला आहे.