अर्थमंत्रिपदासाठी अमित शहा व पियुष गोयल यांची चर्चा

नवी दिल्ली – गेली पाच वर्षे अर्थमंत्रिपद सांभाळलेले अरुण जेटली प्रकृतीच्या कारणारस्तव पुन्हा अर्थमंत्री होण्याची शक्‍यता कमी असल्याचे राजधानीत बोलले जाऊ लागले आहे.

त्या अवस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उजवा हात समजले जाणारे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशीही चर्चा चालू आहे. एका वृत्तसंस्थेने काही मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या हवाला देऊन या शक्‍यता सूचित केल्या आहेत.

यापूर्वीच्या कार्यकाळात अरुण जेटली अनेकदा उपचारासाठी प्रदीर्घ काळ रजेवर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत अनेकदा ही जबाबदारी केंद्रीय रेल्वे आणि ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांना सांभाळावी लागली होती. किंबहुना गोयल यांनी दोन वेळा प्रत्यक्ष अर्थसंकल्प संसदेत सादर केला होत. त्यामुळे गोयल यांचे नावही भावी अर्थमंत्री म्हणून चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.