Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त आयोजित ‘हिंद दि चादर’ कार्यक्रमानिमित्त ते नांदेडला येणार होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. अमित शाह नांदेड दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. तर, दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला होता. मात्र, ऐनवेळी शाह यांचा दौरा आता रद्द झाला आहे. अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असला तरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. Nanded Hindu Di Chadar Navneet Rana :”तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही,” जलील यांना नवनीत राणांचे जशाचे तसे प्रत्युत्तर महत्त्वाचे म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मुंबई महापौर पदाची निवड आणि महायुतीमधील सत्ता वाटपाच्या मुद्द्यावर अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नांदेडमध्ये महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता होती. हेही वाचा: Raju Patil : राज ठाकरे म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी; आता राजू पाटलांची प्रतिक्रिया समोर म्हणाले…