नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. नॉर्थ ब्लॉक मधील गृहमंत्रालयाच्या कार्यालयात ते आज आले तेव्हा त्यांचे गृहसचिव राजीव गौबा आणि अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर शहा यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांशी ओळखही करून घेतली.
गृहमंत्रालयाला जी के रेड्डी, आणि नित्यानंद राय हे दोन राज्यमंत्रीही देण्यात आले आहेत. त्यांनीही आपल्या पदाचा कार्यभार आजच स्वीकारला. नवीन गृहमंत्री म्हणून अमित शहा यांना अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळावी लागणार आहेत. विशेषत: जम्मू काश्मीर मधील स्थिती, नक्षल प्रभावित राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्था ही प्रकरणे त्यांना प्राधान्याने हाताळावी लागणार आहेत.