Amit Shah । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केले आहे. हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळशाऐब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकांमधून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याचे म्हणत निशाणा साधला.
काल शिर्डीत आयोजित भाजपच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी, १९७८ मध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्रात ‘दगा-फटक्याचे’ राजकारण सुरू केले, जे २०२४ मध्ये जनतेने नाकारले. यासोबतच, महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या घराणेशाही आणि विश्वासघाताच्या राजकारणालाही नाकारले.” असे म्हणत दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली.
पुढे अमित शाह म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने हे स्पष्ट केले आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि अजित पवारांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघाताच्या राजकारणाला नाकारले आहे.”
“त्यांना बसायलाही जागा मिळाली नाही पाहिजे ” Amit Shah ।
यावेळी अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीतील विजयापेक्षा मोठा विजय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाला पाहिजे, असं सांगितलं. कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळाली नाही पाहिजे, असं अमित शाह म्हणाले. जोपर्यंत भाजप पंचायत ते पार्लमेंट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत विजय अपूर्ण आहे, असे अमित शाह म्हणाले.
मोदींच्या विकासाच्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केलं आहे, असं अमित शाह म्हणाले. मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपेल, असं देखील अमित शाह म्हणाले. ग्रामपंचायत ते पार्लमेंट पर्यंत तुम्ही भाजप-एनडीएला विजय मिळवून दिला पाहिजे. या वर्षी मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या महापालिका निवडणुका होणार आहेत, तिथं सर्व जागांवर भगवा फडकवायचा आहे, असे अमित शाह म्हणाले.
दिल्ली निवडणुकीत विजयाचा विश्वास Amit Shah ।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून अमित शहा यांनी विरोधी इंडिया अलायन्सवर हल्लाबोल केला आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या विजयावर त्यांनी विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शहांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी, “लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले होते मग अमित शहा यांनी हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना आश्वासन दिले की पराभवानंतरही विजय पुढे आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने हा विजय मिळवला आणि मी अमित शहाजींचा आभारी आहे.”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला. काँग्रेसला २८८ पैकी फक्त १६ जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या मित्रपक्ष शिवसेनेने (उत्तर प्रदेश) २० जागा जिंकल्या, तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाला फक्त १० जागा मिळाल्या. या निकालावरून राज्यात मविआची घटती पकड दिसून येते.
हेही वाचा
‘… तर मी मोबाइल टॉवरवर जाऊन स्वत:ला संपवून घेतो’, संतोष देशमुख यांच्या भावाचा इशारा