नवी दिल्ली -भारताचा अव्वल मुष्टियोद्धा अमित पंघल याने आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेत 52 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवत आगामी टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याची स्वप्नवत कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरण्याची पंघलची ही पहिलीच वेळ आहे.
उपांत्य फेरीच्या लढतीत अमित पंघल याचा चीनच्या जियांगुआन हू याने 3-2 असा पराभव केला. त्यामुळे अमितला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत अमित पांघलने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपाईन्सच्या मानांकित कार्लो प्लाम याचा 4-1 असा पराभव केला होता. पंघलने या आधी 2018 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच 2019 सालच्या विश्वविजेतेपद स्पर्धेतही प्लामला पराभूत केले होते.