नवी दिल्ली : जागतिक अंजिक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताचा बाॅक्सर अमित पंघलने पुरूषांच्या ५२ किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय आॅलिंपिक समितीच्या (आयओसी) बाॅक्सिंग टास्क फोर्स क्रमवारीमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे.
Asian and Commonwealth Games champion Amit Panghal (52kg) grabs No.1 spot in IOC Boxing Task Force's world rankings ahead of next month's Olympic Qualifiers. #Tokyo2020 #AmitPanghal @Boxerpanghal
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2020
पंघलच्या रूपाने दशकभरानंतर भारतीय बाॅक्सरने या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. आॅलिंपिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंहने २००९ मध्ये या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले होते. २४ वर्षीय अमित पंघलच्या खात्यात ४२० गुण आहेत.
अन्य भारतीय खेळाडूमध्ये कविंदर सिंह बिष्ट (५७ किलो) सातव्या तर गौरव बिधुंडी ३२ व्या स्थानी आहे. मनीष कौशिक (६३ किलो) १२ व्या तर शिव थापा ३६ व्या स्थानी आहे.