मुंबई – बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्सस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सूरुवात झाली असून, या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. या चित्रपटातील त्या दोघांचा लूक पहिल्यांदाच समोर आला आहे.
View this post on Instagram
#AamirKhan as #laalsinghchaddha on the sets in Chandigarh #photooftheday #sunday
दरम्यान, या फोटोमध्ये आमिर खान डोक्यावर पगडी आणि लांब दाढीच्या सरदारच्या लूकमध्ये अगदी ठासून दिसतोय. अमिरच्या या फोटोला त्याच्या फॅन्सकडून चांगलीच पसंती मिळतेय. तर दुसरीकडे करिना कपूरचा लूकही समोर आला आहे. या फोटोमध्ये ती एका साध्या मुलीच्या रूपात दिसून येतेय. गुलाबी आणि पांढरा सलवार सूटमध्ये करिना दिसून येतेय. या दोघांच्याही फोटोला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. करिना आणि आमिर ‘थ्री इडियट्स’ नंतर बऱ्याच वर्षांनी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
View this post on Instagram