महाराष्ट्रात फक्त ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट तपासणी किट

मुंबई – ओमायक्रॉन व्हेरियंट सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रासह राज्य सरकारे करोनाच्या या नव्या प्रकाराबाबत चिंतेत आहेत. सर्वात मोठी चिंता महाराष्ट्राची आहे. वास्तविक महाराष्ट्रात बहुतांश लोक बाहेरून येतात. असे असताना सात ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात मिळाले आहेत. त्यामुळे सरकारला भीती आहे की करोनाच्या दुसऱ्या लाटेसाखरी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ नये. दरम्यान, महाराष्ट्रात ओमायक्रॉन पुष्टी करण्यासाठी एस-जीन चाचणीचा अभाव असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात फक्त पुणे आणि मुंबई या दोन जिल्ह्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट तपासणी किट उपलब्ध आहे.अशा परिस्थितीत एस-जीन किट खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना पत्र लिहिले आहे. याबाबत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी ३० नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना पत्र लिहिले आहे. या अंतर्गत ओमायक्रॉनच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी एस-जीन चाचणी करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांना सहज ओळखता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी पुणे आणि मुंबई या दोनच जिल्ह्यांमध्ये एस-जीनच्या चाचणीसाठी किट उपलब्ध आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने SGFT चाचणीसाठी सुमारे 1200 किट्स खरेदी केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.