इन्फोसिसच्या गुंतवणूक दारांना फटका

मुंबई : इन्फोसिसचे शेअर्सचे बाजार भाव एका दिवसात 16 टक्‍क्‍यांनी उतरल्याने गुंतवणुकदारांचे 53 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले. इन्फसिसची गेल्या सहा वर्षातील ही सर्वात मोठी ऑफर आहे.

भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी असणाऱ्या इन्फोसिस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय हे अल्पकालीन फायद्यासाठी गैरप्रकार करतात, अशी दोक्‍याची सुचना देणारे पत्र काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला पाठवले, अशी माहिती काही ाज्ञातांनी पसरवली. त्याच परिणाम कंपनीच्या समभावांवर झाला.

कंपनीचे प्रमुख विशाल सिक्का यांनी कंपनी सोडल्यानंतर दोन वर्षात हे आरोप झाले आहेत. हे आरोप कंपनीच्या लेखा परीक्षण मंडळापुढे ठेवण्यात येतील, त्यावर कंपनीच्या आपत्कालीन धोरणांनुसार निर्णय घेण्यात येतील, असे कंपनीने सोमवारी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.