Janhvi Kapoor । बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. तिचे शिखर पहाडियासोबत अनेकदा नाव जोडले गेले आहे. यातच आता जान्हवी आणि शिखरची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
नुकतेच शिखरने घोडेस्वारी करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. जान्हवी कपूरनेही या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने प्रतिक्रिया देताच पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या अफवा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “घोडा त्याच्या फुफ्फुसामुळे वेगाने धावतो, त्याच्या हृदयामुळे मजबूत उभा राहतो आणि त्याच्या चारित्र्यामुळे जिंकतो.” जान्हवी कपूरने या फोटोवर प्रतिक्रिया देत ‘Uni’ असे लिहिले आहे. याशिवाय या फोटोवर चाहत्यांचाही लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर जान्हवी आणि शिखरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. जान्हवीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तिचा ‘उलझ’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. यानंतर ती ‘देवरा’मध्ये दिसणार आहे. ‘उलझ’ हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. तर देवरा हा एक तेलुगू चित्रपट आहे ज्यामध्ये जान्हवीसोबत सैफ अली खान आणि जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा:
“मला कोणीही फोन मेसेज करू नका…” ; खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक