मुंबई : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे. तिचा एक मोठा चाहतावर्ग महाराष्ट्रात आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हीच गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मराठी सिनेमातलं तिचं हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
लाईक आणि सब्सक्राईब या सिनेमात अभिनेता अमेय वाघसोबत गौतीमी थिरकताना दिसतेय. लिंबू फिरवलं असं या गाण्याचं नाव असून सोशल मीडियावर या गाण्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. नुकताच या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी अमेय मात्र गौमतीवर केलेल्या वक्तव्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काय म्हणाला अमेय वाघ ?
गौतमीसोबत काम करण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अमेयने म्हटलं की, ‘या सिनेमात जो प्रसंग आहे, त्यासाठी गौतमी पाटीलपेक्षा दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत गौतमीचे चाहते आहेत आणि हे सगळ्यांनाच माहितेय. जिथे तिचा कार्यक्रम असतो,तिथे अगदी लोकं झाडावर देखील बसलेली असतात, कुठे छपरावरही बसलेली असतात. तिला बघायला लोकांची खूप गर्दी जमलेली असते. पण जशी तिच्या कार्यक्रमांना गर्दी होते, तशीच मराठी सिनेमांना देखील व्हावी असे अमेय वाघ म्हणाला आहे.