मुंबई -मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी आयोगाच्या निकालानंतर एक फोटो शेअर करत आपले म्हणणे मांडले आहे. राजकीय वर्तुळात सध्या खोपकर यांनी शेअर केलेला हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.
अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्हही नेत्यांचे फोटो असून त्यासह काही मजकूर देखील लिहिला आहे. “आमच्या राजसाहेबांना कूटनीतीने शिवसेना मिळवण्यासाठी छळणाऱ्या उद्धव साहेबांकडूनच शिवसेना हिसकावली गेली. ‘समय बडा बलवान होता है उद्धव साहेब’ वडिलांची पत प्रतिष्ठा आणि ठाकरेंचं वलय घालवून काय मिळवलत? आज विश्वास पटला भगवान के घर देर है, अंधेरी नही” असा मजकूर असलेला फोटो खोपकर यांनी ट्विट केला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 17, 2023
निवडणूक आयोगाचे निष्कर्ष
21 जूनला 55 पैकी 24 आमदार
उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते.
त्याच दिवशी अजय चौधरी यांची
गटनेतेपदी निवड केली गेली.
परंतु 21 जूनलाच एकनाथ शिंदे
यांच्यासोबत 34 आमदार होते.
त्यांनी गटनेता म्हणून
एकनाथ शिंदे यांना निवडले.
त्यामुळे अजय चौधरींची
झालेली निवड बेकायदेशीर.
2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल आयोगाला कळविण्यात आला नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी
बनविलेल्या 1999 च्या पक्षांतर्गत
लोकशाहीचे निकष बदलण्यात आले.
1999 मधील बदल बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते.
शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत.
पक्षांतर्गत निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
त्यामुळे ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.
निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर पक्ष घटना अधिक सुसंगत करण्यात आली.
शिवसेना पक्ष एका कुटुंबाची मालमत्ता झाली.
सादिक अली (तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष) प्रकरणाचा हवाला.
कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर
इंदिरा कॉंग्रेसला बहुमताच्या आधारे मान्यता.
बहुमताची चाचणी आणि
संघटनेतील बहुमत याचाही विचार.
निवडणुकीत कोणत्या गटाला
किती मते मिळाली या मुद्द्यांवर भर
2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला
मिळालेल्या 90 लाख 49 हजार 789
मतांपैकी शिंदे गटाच्या आमदारांना
40 टक्के तर ठाकरे गटाला 12 टक्के मतं.