मुंबई – जगभरात करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत अनेक बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील सेलिब्रिटींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातच मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अमेरिकन गायक ख्रिस ट्रोसडेल याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तो ३४ वर्षांचा होता.
It is with a heavy heart that we confirm the passing of Chris Trousdale on June, 2, 2020 from an undisclosed illness. He was a light to so many and will be missed dearly by his family, friends and fans all over the world. pic.twitter.com/Wlb4qxrF5F
— Chris Trousdale (@OfficialCRT) June 3, 2020
२१ मे रोजी कॅलिफोर्नियातील रुग्णालयात करोनाची लागण झालेल्यामुळे भरती करण्यात आले होते. १२ दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्याचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर दोन जूनला ख्रिसची प्राणज्योत मालवली. ख्रिस ट्रोसडेल अमेरिकेतील एक प्रसिद्ध गायक, संगीतकार होता. बायबँड या प्रसिद्ध म्युझिक ग्रुपमधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘इट हँपन एव्हरी टाईम’, ‘डान्स फॉर लव्ह’, ‘गॉट गेट द गर्ल’, ‘विथ ऑल माय हार्ट’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्याने गायली आहे. गाण्यासोबतच तो अभिनयक्षेत्रातही कार्यरत होता.