पुणे, दि. 25- भारतीय कुठेही गेले तरी भारतीयच असतात. हिंदी है हम। हा बाणा काही ते सोडत नाहीत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा करोनाच्या साथीमुळे आला. शेकडो अनिवासी भारतीयांनी ट्विटरवर मदतीसाठी मोहीम शिरू केली आहे, तर अमेरिकेत स्थायिक झालेल्यांनी त्या देशात अतिरिक्त असणारा ऍस्ट्राझेन्का लसीचा साठा भारताला पाठवण्याचे आवाहन ज्यो बायडेन प्रशासनाला केले आहे.
करोनाच्या भारतातील स्थितीविषयी माहिती मिळवण्यासाठी अनिवासी भारतीयांसाठी ट्विटर आणि इन्स्टाग्राम हे प्राथमिक स्रोत बनले आहेत. त्यामुळे या समाजात एक विलक्षण असहायतेची भावना तयार झाली आहे. रुग्णालयाबाहेर उभी असणारी हताश माणसे, सामुदायिक अंत्यसंस्कार, ऑक्सिजनची टंचाई याबाबत वाचून छायाचित्रे पाहात आहेत. याच माध्यमांवर असंख्य जण ऑक्सिजन बेव, सिलिंडर, प्लाझ्मा यांचीही चौकशी करत आहेत.
गुगल डॉक आणि अन्य टूलकिट बनवले जात आहेत. अशीही तुला हा समाज री शेअर री ट्विट किंवा फॉरवर्ड करत साथी हाथ बढानाची साद घालतोय ती अगदी गहिवरल्या अंतःकरणाने.
अमेरिकेने लस उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल भारताला निर्यात करावा वाटतो, त्यासाठी तेथील शक्तिशाली भारतीय अमेरिकन लोकांचा राजकीय दबाव गट काय करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून तर मुद्दे येत आहेतच, पण आपली ओळख दाखवतही मदत करण्याचे आवाहन पुढे येत करत आहेत.
उदाहरण द्यायचे झाल्यास तेथे स्थायिक झालेले आशिष झा या डॉक्टरांनी अमेरिकन सरकारला थेट दूरध्वनी केला आणि म्हणाले , आपल्याकडे ऍस्ट्राझेन्का लसीचे साडेतीन ते चार कोटी डोसचा साठा आहे. तो आपण कधीच वापरणार नाही. तो आपण भारताला उधार किंवा तसाच देऊ शकतो का? तो लगेच दिला तर त्याचा लाभ अधिक होईल.
क्वीन्स येथे वास्तव्यास असणारे पत्रकार मित्र कलिता लिहितात, दोन्ही देशातील परिस्थितीतील फरक पाहा… अमेरिकेत सर्वांना लास उपलब्ध आहे. आंनदाच्या आणि उत्साहाच्या सेल्फीज सर्वत्र आहेत, तर भारतात नातेवाईक आणि मित्र बेड्सची याचना करत आहेत. पहिला आणि दुसरा डोस मिळेपर्यंत जगण्यासाठी प्रार्थना करत होते.
या तुलनेत आंतरराष्ट्रीय नानेनिधींच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथन यांनी साधारण विधान केले. भारतातील विचित्र परिस्थितीने अस्वस्थ आहे. माझे अनेक कुटुंबीय, मित्र आणि सहकारी करोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत आहेत.
आपल्या प्रचारात भारतीय वंशीय असल्याचे अभिमानाने मिरवणाऱ्या कमला हॅरिस यांनी बाळगलेले मौन सर्वांना अस्वस्थ करणारे आहे.