वॉशिंग्टन – आपल्यावरील गैरव्यवहाराचा आरोप रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांनी न्युयॉर्क येथील बॅंकरप्सी कोर्टात केला होता पण त्यांची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
अमेरिकेतील रिचर्ड लेव्हीन यांनी नीरव मोदींवर हा गैरव्यवहाराचा आरोप केला असून त्याची सुनावणी सध्या कोर्टापुढे सुरू आहे. नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहार आणि फसवणूक प्रकरणात त्यांच्याकडून किमान 15 दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणात नीरव मोदी बरोबरच मिहीर भन्साळी आणि अजय गांधी हे आरोपी साथीदार आहेत. नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड, फॅन्टसी आयएनसी, आणि ए जेफ अशा तीन संस्था आहेत. त्याने या कंपन्यांच्या मार्फत ही फसवणूक केली असल्याचा आरोप आहे.