वॉशिंग्टन – जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि महासत्ता म्हणून वर्णन केल्या गेलेल्या अमेरिकेची सामाजिक अवस्थाही चांगली नाही या देशाला अद्यापही आपल्या देशातील दारिद्र्याची समस्या सोडवण्यात यश आलेले नाही. 1970 नंतरच्या घडामोडींचा विचार करता गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये अमेरिकेतील गरिबी कायम आहे. विद्यमान लोकसंख्येपैकी 10% लोकसंख्या गरीब आहे. देशातील सहा लाख लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही भारतीय रुपयामध्ये विचार करता अमेरिकेमध्ये सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी वार्षिक उत्पन्न किमान 29 लाख रुपये असणे आवश्यक आहे.
पण अमेरिकेतील अनेक लोकांना एवढे उत्पन्न मिळवणे शक्य होत नाही एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नांमधील वाढ जरी 16% झाली असली, तरी त्याच्या अनेक पट वाढ महागाईमध्ये झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीणेही अवघड झाले आहे. घर बांधणी महाग आणि सर्वसामान्यांना न परवडणारी असल्याने अनेक लोकांनी कोणत्याही प्रकारचे घर न घेता आपापल्या वाहनांमध्ये संसार थाटल्याचे लक्षात येते याव्यतिरिक्त ज्यांचे स्वतःचे घर नाहीत.
त्यांना भाड्याने घर घेणे सुद्धा परवडत नाही अमेरिकेतील शिक्षण व्यवस्था सुद्धा महाग झाली असल्याने आठ लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये शिक्षण मध्येच सोडून दिले आहे. शिक्षणाच्या तुलनेने मिळणारा रोजगार हा योग्य नसल्याने अनेक लोक केवळ नाराजीनेच आपले काम करत आहेत.
इतकेच नाही तर दररोज 8 ते 10 तास काम करून मिळणाऱ्या मजुरी पेक्षा रक्त विकून मिळणारे पैसे जास्त असल्यामुळे गरीब आणि कमी उत्पन्नाचे नागरिक आता रक्त आणि रक्तातील प्लाजमा विकून आपली गुजराण करत आहेत एकदा रक्त किंवा रक्तातील प्लाजमा विकला तर त्याला तीन ते पाच हजार रुपये मिळतात. त्याची दिवसाची मजुरी यापेक्षा खूपच कमी असल्यामुळे अनेक लोकांनी आता हा मार्ग स्वीकारला आहे.