बीजिंगमध्ये अमेरिकन दूतावासाबाहेर स्फोट

बीजिंग – चीनची राजधानी बीजिंगमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर स्फोट झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त हाती आले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. हा स्फोट कोणी व का केला याचीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. शिवाय कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

स्थानिक माध्यमानुसार, एका व्यक्तीने हाताने बनवलेला बॉम्ब गेटच्या दिशेने फेकला. हा स्फोट भीषण नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, या घटनेवर चीन आणि अमेरिकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)