दहशतवादाविरोधाच्या लढाईत अमेरिका नेहमीच भारतासोबत

हाऊडी मोदी कार्यक्रमातून मोदींचा ट्रम्प यांच्यासमोर पाकला इशारा

ह्युस्टन : अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पाकिस्तानला इशारा दिला आहे. दहशतवादाविरोधाच्या लढाईत अमेरिका नेहमीच भारतासोबत असणार आहे, असे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव न घेता मोदींना त्यांना टोला लगावला. त्याचबरोबर, दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अध्यक्ष ट्रम्प दहशतवादाविरोधात उभे आहेत, असे मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले. ज्यांना स्वत:चा देश सांभाळता येत नाही, अशा मंडळींनी भारतद्वेषाला केंद्रस्थानी ठेवले. दहशतवादाचे समर्थन देणाऱ्यांना सारे जग ओळखून आहे. 9 /11 किंवा 26/11 चे सूत्रधार कोठे सापडतात, असे म्हणताच त्यांच्या या वाक्‍याला प्रचंड प्रमाणात दाद मिळाली.

पंतप्र्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जम्मू-काश्‍मीरविषयीच्या कलम 370 ला फेअरवेल दिले असल्याचे म्हटले. भारतासमोर मागील 70 वर्षापासून 370 हे मोठे आव्हान होते त्यालाच काही दिवसांपुर्वी फेअरवेल देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. मागील 70 वर्षापासून जम्मू-काश्‍मीरचे नागरिक ज्या अधिकारांपासून वंचित होते ते अधिकार 370 रद्द केल्यानंतर त्यांना आता मिळणार असल्याचेही मोदींनी म्हटले. ह्युस्टनमधील या मेळाव्याचे हाउडी मोद हे नाव आहे. पण मोदी एकटा कोणी नाही. 130 कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा मी साधारण व्यक्ती आहे. यंदा भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61 कोटी जनतेने ऐतिहासिक कौल दिला. या निवडणुकीने भारतीय लोकशाहीची ताकद जगभर दाखवून दिली. 60 कोटी मतदारांनी जगाला संदेश दिला, की भारतात सारे काही छान चालले आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित हजार अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर विश्वास व्यक्त केला. मोदी आणि ट्रम्प यांनी परस्परस्तुती करून आणि भारत-अमेरिका मैत्रीचा विविधांगी आढावा घेतानाच, इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचे आश्वासनही स्वतंत्र भाषणांमध्ये दिले. ही सभा अनेक अर्थानी एतिहासिक ठरली. कारण यानित्तिाने प्रथमच अमेरिकी अध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेमध्ये एखाद्या सभेला संबोधित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)