Ameesha Patel – बॉलिवूडमधील आपल्या पहिल्याच चित्रपटाने चाहत्यांची मने मोहून टाकणारी अभिनेत्री अमिषा पटेल हिला कोण ओळखत नाही? आपल्या कारकीर्दीत सर्व प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करणार्या अमीषा पटेलने करिअरची सुरुवात 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटामधून केली होती. या चित्रपटाने अमिषाला रातोरात सुपरस्टार बनवले.
गेल्या काळात अमिषाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले मात्र, या गोष्टींवर कधीही अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही आणि स्वत: अमिषाने याविषयी काहीही म्हटले नाही. अमिषा 49 वर्षाची आहे. मात्र अजूनही तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळालेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अमिषा आणि पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास यांच्या नात्याच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. अमिषा आणि इमरान अब्बास यांचे अनेक फोटो सुद्धा व्हायरल झाले असून, लवकरच अभिनेत्री इमरानसोबत लग्न करणार असल्याचं देखील बोललं गेलं.
दरम्यान, अश्यातच स्वतः अमिषाने यासगळ्या चर्चांवर पडदा टाकला आहे. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं तिने सांगितलंय. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यावर भाष्य केलं आहे. ‘रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आमच्या नात्याची चर्चा रंगली आहे. असं ती म्हणाली.
अमिषा पुढे म्हणाली, ‘आम्ही कार्यक्रमांमध्ये भेटतो. आम्ही चांगले मित्र आहोत. परदेशात कोणते कार्यक्रम असेल तर आम्ही भेटतो. दोन चांगल्या दिसणाऱ्या लोकांना पाहिल्यानंतर अफवा सुरु होतात. तो देखील सिंगल आहे, मी पण सिंगल आहे. म्हणून लोकांना असं वाटतं की आमचं लग्न व्हायला हवं. त्यानंतर अफवा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरतात’. असं अभिनेत्री आमिषा पटेल यावेळी म्हणाली आहे.