Ahilya Nagar Exit Poll : अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी 68 जागांसाठी मतदान पार पडले आहे. आता उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी आता मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. त्यानुसार येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साम टीव्हीने एक्झिट पोल जाहिर केले आहेत. त्यानुसार, भाजप – १९, अजित पवार – २४, शिंदे सेना – १४, इतर – ०, काँग्रेस – २, ठाकरे सेना ४, राष्ट्रवादी शरद पवार – ४, बसप – १, अशा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मागील वेळी महापौर हा भाजपचा होता. त्यावेळी तेव्हाची एकत्रित राष्ट्रवादी भाजपच्या सोबत होती. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपनं युती केली होती. मतदानाआधीच भाजपच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. या ठिकाणी शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढली होती. युती विरुद्ध शिंदेसेना अशी ही लढत चुरशीची होती.