रुग्णवाहिकांची विनाऑक्सिजन नुसतीच धावाधाव

ग्रामीणमधून पुणे शहरात येणाऱ्या करोना बाधितांना अडचणी

पुणे – ग्रामीण भागांतून शहरात करोना बाधित व्यक्तीला उपचारासाठी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा नसते. त्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांमध्ये पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर किंवा किट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

पुणे शहरासह ग्रामीण भागात दररोज करोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मृत्युचे प्रमाणही अधिक आहे. ग्रामीणमध्ये रुग्णालयांची संख्या कमी, तसेच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची संख्या तटपुंजी आहे.

 

त्यामुळे लक्षणे तीव्र असल्यास बाधिताला शहरातील रुग्णालयांत दाखल केले जाते. त्यासाठी ज्यातून बाधिताला घेऊन जातात, त्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधा नसते, असे शिवतरे यांनी म्हटले आहे.

 

डिजिटल एक्स-रे मशिनही गरजेची

ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांत दाखल करोना बाधितांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे दिसून येते. तर फुफ्फुसामध्ये संसर्ग वाढत असल्याचे दिसते. मात्र, याठिकाणी डिजिटल एक्स-रे मशिन उपलब्ध नसल्याचे रुग्णांची तात्काळ तपासणी करून त्यांना उपचार देणे शक्य होत नाही. त्यामुळे याठिकाणी डिजिटल एक्स-रे मशिन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.