ऑक्सिजन टॅंकर्सना रुग्णवाहिकेचा दर्जा

कोल्हापूर – महाराष्ट्र शासनाने मेडिकल ऑक्सिजन वाहून नेणा-या क्रायोजनिक टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा बहाल केला आहे. या टँकर्सव्दारे ऑक्सिजनचा पुरवठा विनाअडथळा लवकरात-लवकर रुग्णांपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी हा विशेष दर्जा देण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याचा त्वरित अंमल करत अशा क्रायोजनिक ऑक्सिजन टॅंकर्सना त्वरित फ्लॅश लाईट, सायरन व ऍम्ब्युलन्स लिहिलेली पाटी अशा दुरुस्त्या करण्याच्या सूचना दिल्या व त्या अमलात आणल्या. या टँकर्समुळे रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यासाठी कमीत-कमी वेळ लागेल. रुग्णवाहिका दर्जाच्या टॅंकर्सना स्पीड गव्हर्नरचे बंधन असणार नाही.

टोल नाक्यावर सुद्धा त्यांना न थांबवता जागा करून दिली जाईल. कोणी अधिकारीसुद्धा तपासणी करण्यासाठी अशा वाहनांना अडवणार नाही व टँकर विनाअडथळा ऑक्सीजनची गरज असणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचतील. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व अधिकारी ऑक्सिजन टँकर्स वाहतुकीचे नियोजन करत असून विनाअडथळा असे टँकर्स गरज असणा-या कोरोना रूग्णांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्नशील आहेत.

याप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्ट‍िव्हन अल्वारिस, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, रोहित काटकर, मोटर वाहन निरीक्षक निलेश ठोंबरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव वाहन चालक बाळासाहेब कुंभार व राजाराम पारधी इ. उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.