आंबेगाव- आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी ( दि. २९ ) तब्बल १५ कोरोना रुग्णांचा तपासणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे . वडगाव काशिंबेग गावात ७ रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आंबेगाव तालुका हा ‘कोव्हिड १९ ‘चा हॉटस्पॉट बनला आहे.
आंबेगाव तालुक्यात यापूर्वी दहा जण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये साकोरे -१, शिनोली – ३, निरगुडसर -१, जवळे -१ ,वडगाव काशिंबेग – १ ,पिंगळवाडी -१, वळती -१, गिरवली -१ त्यातील शिनोली येथील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे .मात्र शुक्रवारी ( दि. २९ ) आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार वडगाव काशिंबेग येथे ७ , शिनोली येथे १ , फदालेवाडी – ३, एकलहरे – १, पेठ -२ तर घोडेगाव येथे १ जण असे एकूण १५ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे आंबेगाव तालुका कोरोनाचा ‘ हॉट स्पॉट ‘ बनला असल्याचे जाणवत आहे.
आंबेगाव तालुक्यातील बहुतेक मोठी छोटी शहरे, गावे बाजारपेठा बंद आहेत. प्रत्येक गावात ‘कोव्हिडं १९ ‘कमिटी आपले काम व्यवस्थित करत आहे. पोलीस प्रशासनही गावातील सर्व कमिटी यांना मदत करत आहेत .मात्र मुंबईकरांनी तालुक्यावर आणलेले हे संकट आज अखेरीस पंचवीस पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक रुग्ण बरा झाले असल्यामुळे २४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचार हे तालुक्यातच व्हावे. अशी व्यवस्था सुद्धा करणे गरजेचे झाले आहे.
वडगाव काशिंबेग गावात ७ रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने गावाला भेट दिली . मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे ,पोलिस जवान विनोद गायकवाड यांनी वडगाव काशिंबेग येथे जाऊन ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या . यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे .