मंचर – आंबेगाव तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादींचा प्रभाग निहाय कार्यक्रम झाला जाहीर झाला असल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील 33 पोटनिवडणूक ग्रामपंचायतींपैकी आहुपे, कु शिरे, फुलवडे, गंगापूर खुर्द, फदालेवाडी/उगलेवाडी, गोहे बु, गोहे खुर्द, फलोदे, पाटण, तळेकरवाडी, थुगांव, लांडेवाडी/पिंगळवाडी, ठाकरवाडी, चास, टाकेवाडी, नांदुर, कळंब, लौकी, भागडी, निरगुडसर, जारकरवाडी, खडकवाडी, मांदळेवाडी, तांबडेमळा, कोळवाडी/कोटमदरा, जवळे, पहाडदरा, चांडोली बु., बोरघर, गिरवली, टाव्हरेवाडी, महाळुंगे तर्फे घोडा व डिंभे बु. या ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी 1 नोव्हेंबरची ग्राह्य धरण्यात आली आहे.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकींच्या टप्प्यामध्ये 12 नोव्हेंबरला प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे, तर 12 ते 16 नोव्हेंबर मतदार याद्यांबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती या कालावधीत दाखल करणे आणि 18 नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.