मंचर – आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव परिसरातील कोळवाडी, पोखरकरवाडी, पिंपळगाव तर्फे घोडा, येथील मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी वळसे पाटील यांचे नागरिकांनी पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केले.
याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे, माजी सभापती कैलासबुवा काळे, भाजपाचे नेते जयसिंग एरंडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, राजू काळे, ज्योती घोडेकर, शरद बँकेच्या संचालिका रुपाली झोडगे, बाजार समितीच्या संचालिका रत्ना गाडे, माऊली घोडेकर, किरण घोडेकर, वैभव मंडलिक, कोळवाडीचे सरपंच मुरलीधर आसवले, माजी सरपंच शुभांगी काळे, अरुण कवठे, दत्ता बुरसे, आनंद उगले, संदीप गिजरे, अशोक गाडेकर सुनील डगळे, मच्छिंद्र बुरसे प्रतीक कवठे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले ” गेली ३५ वर्षांमध्ये आपण आपण केलेला विकास हा शाश्वत आहे. पाण्याच्या योग्य नियोजनामुळे तालुक्याचा बराचसा भाग सुजलाम सुफलाम झाला.
तालुक्यातील भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बँक, खरेदी विक्री संघ आधी संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली . विरोधकांकडून मात्र ” केवळ ३५ वर्षात काय केले अशीच विचारणा होताना दिसत आहे.त्यांच्या कडे पुढील काही व्हिजन नाही.केवळ अपप्रचार सुरू आहे.त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका.असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.याप्रसंगी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी पोखरकरवाडी मधील ग्रामदैवत करंजा देवीचे दर्शन घेतले.यावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून वळसे पाटलांचे स्वागत केले.