पेठ व सातगाव पठार भागात चिंतेत वाढ…
पेठ(प्रतिनिधी) : पेठ (ता. आंबेगाव) येथील एकाच घरातील दोन व्यक्तींना कोरोना संशयित तपासनीसाठी नेले असता आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पेठ व सातगाव पठार भागात चिंतेत वाढ झाली आहे. पेठमधील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे यांनी दिली.
सातगाव पठार भागातील सात गावांची मुख्य बाजार पेठ म्हणून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ गाव हे तालुक्याचे प्रवेशद्वार आहे आता पेठ येथील 2 रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे खबरदारी चा उपाय म्हणून पेठ गावात विशेष उपाययोजना करणार असल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.
पेठ गावाच्या सरपंच सुरेखा पडवळ,उपसरपंच अनिल सणस,माजी उपसरपंच संतोष धुमाळ,अशोक राक्षे व ग्रामस्थ यांनी कामगार तलाठी हेंमत भागवत ,ग्रामसेवक चौगुले भाऊसाहेब यांनी तातडीने कडक उपाययोजना सुरु केल्या आहेत.या दोन कोरोना बाधित व्यक्ती कोणाच्या संपर्कात आल्या याविषयी पेठ प्राथमिक वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने चौकशी सुरू केली आहे.जे त्यांच्या संपर्कात आले त्या सर्वांना तपासणी साठी नेण्यात येणार आहेत.
आता पर्यन्त पेठ,कुरवंडी या दोन गावात कोरोना संशयित निघाले होते पण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.आता मात्र पेठ गावात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र नाका बंदी करून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत व वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली सिनोली येथील पॉझिटिव्ह रुग्णा वर उपचार करून तो व्यक्ती निगेटिव्ह आला हे वगळता पॉझिटिव्ह ची संख्या वाढत चालली आहे.लवकरच तातडीच्या उपाययोजना राबवून ही संख्या कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील अशी माहिती प्रशासना तर्क देण्यात आली.
गावांना तहसिलदार रमा जोषी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी भेट देऊन गावांना जा-ये करणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. तर नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले.