मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघ संघात एकूण 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या पैकी सहा उमेदवारी माघार घेतल्याने 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या तालुका संघटिका सुरेखा निघोट यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे घोडेगाव तहसील कार्यालय येथे निवडणूक कार्यालय असून तेथे उमेदवारी अर्ज माघारी साठी अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या तालुका संघटिका सुरेखा निघोट यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीकडून म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून तालुका संघटिका सुरेखा निघोट इच्छुक होत्या; परंतु येथील जागा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्याने त्यांच्या मागणीचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार न केल्यामुळे अखेर शेवटी त्यांनी बंडखोरी केली आहे. त्याचा फटका महाआघाडीचे उमेदवार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माघार घेणारे उमेदवार :
बाबाजी चासकर, सतीश पाचंगे, संदीप सोनवणे, दीपक गावडे, मंगेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार.
यांच्यात होणार लढत (पक्ष)
दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट), देवदत्त जयवंतराव निकम (शरद पवार गट), सुनील इंदोरे (मनसे), दीपक घोलप (हिदु हिंदुस्तान जनसेवा पक्ष), दीपक पंचमुख (बुहूजन विकास आघाडी), सुरेखा निघोट, देवदत्त शिवाजीराव निकम, लक्ष्मण निकम, निवृत्ती गावडे, संदीप वाघ, शीतल भारमळ (सहाही जण रिंगणात).