आंबेडकरांना संस्कृत भाषा न शिकल्याची खंत – मोहन भागवत

नागपूर  – नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात बोलताना भागवत यांनी भारतातील प्राचीन संस्कृत भाषेबद्दलचे महत्त्व स्पष्ट करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते तसेच त्यांना संस्कृत भाषा न येत असल्याची खंत व्यक्त केली होती. असे वक्तव्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालयात भागवत म्हणाले, की भारतातील प्रत्येक भाषेत 30 टक्के संस्कृत शब्द आहेत. संस्कृत ही एक ज्ञानभाषा आहे. खगोल, वनस्पती, कृषीशास्त्र या शास्त्रातील भारतातील ज्ञान संस्कृतमध्ये आहे. संस्कृत भाषा हाच भारताचा मुख्य डीएनए आहे आणि ही भाषा केवळ धर्माचार्यांपुरती मर्यादित राहता कामा नये इंग्रजी भाषा पूर्णपणे संस्कृतचे भाषांतरण करू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले होते. शास्त्रज्ञ उपनिषधांचा अभ्यास करू लागले आहेत. विदेशातील अनेक विद्यार्थी संस्कृतचा अभ्यास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.