आंबेडकरांना युती करायचीच नव्हती- मुणगेकर

मुंबई: वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसबरोब यावे अशी आमची इच्छा होती. परंतु प्रकाश आंबेडकरांना जरी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती तरी त्यांना आघाडी कारायचीच नव्हती. अशी टीका काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुणगेकर म्हणाले की, आंबेडकरांनी केलेल्या मागण्या प्रत्येकवेळेस अवास्तवच होत्या. कारण त्यांना आघाडी करायचीच नव्हती. त्यामुळे कायम त्यांनी ताठरच भूमिका घेतली आहे. तसेच सरकारवर टीका करताना मुणगेकर म्हणले कि, सरकार कडून दलित शब्द न वापरता अनुसूचित शब्द वापरण्याचा आग्रह केला जात आहे. तो बिनकामाचा असून दलित शब्दाला प्राप्त झालेली धार कमी करण्याचाच हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)