#ICCWorldCup2019 : निवड न झाल्याने अंबाती रायडूने केली नाराजी व्यक्त

हैदराबाद – इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून या संघात अंबाती रायडूला वगळूर विजय शंकरला संघात स्थान मिळाले असून त्याला चौथ्या कक्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाण्यची शक्‍यता आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या रायडूला निवड समितीने संघात स्थान न देण्याचा निर्णय निवड समीतीने घेतल्यानंतर रायडूने प्रतिक्रिया देताना एका अजब ट्विटने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसादयांनी रायडूच्या जागी शंकरची निवड का केली या प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले की, शंकर हा थ्री डायमेंश्‍नल (3डी) असलेला खेळाडू आहे. त्याचा वापर आपण इकोठेही करु शकतो त्यामुळे आम्ही त्याची संघात निवड केली. नीवड समीतीने दिलेले हे कारण बहुदा रायडूला पचनी पडले नसावे त्यामुळे त्याने यावेळी विश्‍वचषक पाहण्यासाठी नुकताच एक नवीन थ्रीडी चष्मा ऑर्डर केल्याचे ट्‌विट केले.’ असे ट्‌विट केले. त्याच्याअ ट्‌विटवरुन उलट सुलट चर्चा सुरू झाली असून यावर निवड समीतीची कोणतीही प्रतिक्रीया अद्याप मिळालेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.