नवी दिल्ली – सन 1970 च्या सुमारास भारतीय रस्त्यावर अधिराज्य असलेली अँबेसिडर कार आता पुनरागमन करण्याची शक्यता आहे. मात्र हि कार आता इलेक्ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्यता आहे.
अँबेसिडर कारची निर्मिती हिंदुस्थान मोटर्सद्वारा करण्यात येत होती. 1985 भारतामध्ये या कार कंपनीचा वाटा तब्बल 75 टक्के इतका होता. मात्र नंतर नव्या कार बाजारात आल्यानंतर अँबेसिडर कार मागे पडत गेली होती. आता पुन्हा या कारचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हिंदुस्तान मोटर्स कंपनी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते.
हिंदुस्थान मोटर्स एका युरोपियन कंपनीबरोबर सहकार्य करार करीत आहे. या कराराअंतर्गत सुरुवातीला इलेक्ट्रिक दुचाकी तयार करण्यात येतील. त्यानंतर इलेक्ट्रिक अँबेसिडर कार तयार करण्याची या कंपनीची योजना आहे. यासंदर्भात सहकार्य करार करण्याबाबत प्रयत्न चालू असून तीन महिन्यांमध्ये या घडामोडी पूर्ण होतील असे कंपनीतर्फे सूचित करण्यात आले आहे.
नव्या वाहन निर्माता कंपनीमध्ये हिंदुस्थान मोटर्सचा वाटा 51 टक्के असणार आहे. तर युरोपातील कंपनीचा वाटा 49 टक्के इतका असणार आहे. नवी कार हिंदुस्तान मोटर्सच्या चेन्नई येथील कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. 2014च्या सप्टेंबर मध्ये शेवटची अँबेसिडर कार तयार करण्यात आली होती. त्यानंतर हिंदुस्थान मोटार्सवर कर्जाचा बोजा वाढला आणि अँबेसिडर कारची मागणी कमी झाली.
त्यामुळे अँबेसिडर कारची निर्मिती बंद करण्यात आली होती. 1980 मध्ये भारतामध्ये प्रमुख नेते अँबेसिडर कारचा वापर करत होते. त्यावेळी भारतामध्ये जनतेची क्रयशक्ती कमी असल्यामुळे कारची मागणी कमी होती. 1984 मात्र नंतर मात्र देश-विदेशातील कंपन्यांनी विविध किमतीच्या आणि आणि तंत्रज्ञानाच्या कार भारतामध्ये सादर केल्या. त्यानंतर अँबेसिडर मागे पडत गेली होती.