Mukesh Ambani | Nita Ambani : जगातील सर्वांत श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत विलासी जीवन जगतात. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांवर, पार्ट्यांवर संपूर्ण जगाची नजर असते. सगळीकडेच त्यांचीच चर्चा होताना दिसते. मात्र, अश्यातच नीता अंबानी यांना त्यांचे पती म्हणजेच मुकेश अंबानी यांच्याकडून एक खास भेट मिळाली आहे.
मुकेश अंबानी यांनी मोठी डील पूर्ण केली आहे. वर्षभरापासून सुरु असलेल्या चर्चेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने वायाकॉम 18 आणि डिज्नीची डील पूर्ण केली आहे. 70 हजार 352 कोटींची ही डील आहे. या डीलमुळे डिज्नी स्टार इंडिया आणि रिलायन्सचे वॉयकॉम-18 एक झाले आहे.
या नवीन कंपनीची जबाबदारी मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांच्याकडे दिली आहे. 100 पेक्षा जास्त चॅनल आणि दोन ओटीटी चॅनल असणाऱ्या या मीडिया कंपनीची सूत्र नीता अंबानी सांभाळणार आहे. त्या या संयुक्त भागेदारी कंपनीच्या चेअरमन असणार आहे. तसेच या कंपनीत तीन सीईओ असणार आहे.
70 हजार 352 कोटी रुपयांच्या या डीलमध्ये रिलायन्सची 63.16 टक्के भागिदारी आहे. डिज्नीजवळ 36.84 टक्के भागेदारी असणार आहे. या ज्वाइंट व्हेंचरचे मूल्य एकूण 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. त्यातून वर्षाला 26000 कोटी रुपये महसूल मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नीता अंबानी या कंपनीच्या चेअरमन झाल्या आहेत. परंतु त्यांच्यासमोर सोनी, नेटफ्लिक्स, एमेजॉनसारख्या कंपन्यांचे आव्हान असणार आहे. या मेगा डीलचा परिणाम रिलायन्सच्या शेअरवर दिसणार आहे.