१० लाख व्यक्तीच्या कोव्हिड-१९ लसीकरणाचा खर्च अमेझॉन करणार

कर्मचारी, डिलिव्हरी असोसिएट, लघु-मध्यम विक्रेते यांचा समावेश

मुंबई- आता भारतात ४५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांसाठी कोव्हिड-१९ लसीकरण उपलब्ध झाले असल्यामुळे अमेझॉन इंडिया फक्त त्यांचे कर्मचारीच नव्हे तर डिलिव्हरी असोसिएट, ऑपरेशन पार्टनर, अमेझॉन फ्लेक्स ड्रायव्हर, स्टोअर पार्टनर, ट्र्क पार्टनर आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार आहे. अमेझॉन डॉट इन वर गेल्या वर्षीपासून नोंदलेले सर्व विक्रेतेही या सवलतीचा लाभ घेऊ शकतील असे अमेझॉन इंडिया ने जाहीर केले आहे.

अमेझॉन ने आपले स्वतः चे कर्मचारी आणि स्टफिंग एजन्सी तर्फे नेमण्यात आलेले कर्मचारी यांना आवश्यक टी सर्व मदत मिळेल अशी व्यवस्था केली आहे. अमेझॉन इंडिया कोव्हिड -१९ लसीकरण, उपचार, हॉस्पिटल मिळवून देणे आणि कोव्हिड -१९ च्या संदर्भात आवश्यक त्या चाचण्या याचा खर्च करील. सध्याच्या स्थितीत आवश्यक ती सर्व तयारी ठेवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी अमेझॉन ने जगभरातील कर्मच-यांना दिलेल्या २.५ अब्ज डॉलर च्या बोनस आणि प्रोत्साहन रकमेच्या व्यतिरिक्त आणि कोव्हिड-१९ संबंधीच्या उपाययोजनांसाठी खर्च केलेल्या ११.५ अब्ज डॉलरच्या वर हे लाभ दिले जात आहेत. या उपाययोजनांमध्ये जगभरातील कर्मचा-यांसाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट (पीपीइ) आणि इतर सुरक्षितता उपाय तसेच रोख साह्य यांचा समावेश आहे.

एप्रिल २०२० मध्ये २.५ लाख डॉलर चा अमेझॉन रिलीफ फंड स्थापन केला आणि पात्र विक्रेते आणि इतर सह व्यावसायिकांना मदत केली. या निधीतून कोव्हिड-१९ ची बाधा झालेल्या आणि क्वारंटाईन मध्ये असलेल्या पात्र व्यक्तीना साह्य मिळते. ही सवलत डिलिव्हरी असोसिएट्स, अमेझॉन फ्लेक्स मधले भागीदार आणि ट्रकिंग पार्टनर्स यानाही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी देण्यात आली आहे. अमेझॉन ने त्यांच्या व्यवसायाशी लॉजिस्टिक्स साठी जोडलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक पार्टनर सपोर्ट फंड सुद्धा सुरु केला आहे. या निधीतून अशा उद्योगांना एप्रिल २०२० पासून सुरु असलेल्या लॉक डाऊन आणि नंतरच्या परिस्थितीत झालेल्या आर्थिक हानीत स्थिर खर्च भरून काढणे आणि खेळता पैसा उपलब्ध असणे यासाठी मदत दिली जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.