पुण्यानंतर मुंबईतही ऍमेझॉन कार्यालयात खळखट्याक

मुंबई – पुण्यानंतर मुंबईतील ऍमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. चांदिवली येथील ऍमेझॉनच्या दोन कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी घुसून तोडफोड केली. याआधी ऍमेझॉनचे पुण्यातील कार्यालय फोडण्यात आले होते.

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात ऍमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा ऍमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या ऍमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.